तिसरा महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव २०२५: बुद्धिबळ प्रेमींसाठी एक भव्य सोहळा
तिसरा महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव २०२५ हा भारतीय बुद्धिबळ दिनदर्शिकेतील एक भव्य सोहळा ठरणार आहे, जिथे सर्व स्तरातील खेळाडू अत्यंत चुरशीच्या वातावरणात सहभागी होण्यासाठी एकत्र येतील. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना (MCA) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा प्रतिष्ठित महोत्सव अमनोरा मॉल, पुणे येथे भरणार आहे, जे अशा मोठ्या स्पर्धांसाठी अद्ययावत सोयींनी युक्त असे स्थळ आहे.
महाराष्ट्र हा बुद्धिबळातील एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, हा महोत्सव त्या परंपरेला चालना देणारा ठरणार आहे. २०२५ च्या या आवृत्तीमध्ये चार प्रमुख गटांमध्ये स्पर्धा होणार आहेत, जे वेगवेगळ्या रेटिंगच्या खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करतील. गतवर्षी पीटर स्वीडलर, विदित गुजराथी, नायजेल शोर्ट आणि रौनक साधवानी यांच्यातील द्वंद्वाचा साक्षीदार असलेल्या ह्या महोत्सवात यावर्षी FIDE महिला ग्रँड प्रिक्स देखील समाविष्ठ असल्याने महाराष्ट्राच्या बुद्धिबळ शिरपेचात मनाचा तुरा रोवला जाणार आहे. ₹५०,००,००० एकूण बक्षीस निधी असलेल्या या महोत्सवात खूपच चुरशीच्या लढती अनुभवायला मिळणार असून हा सोहळा प्रत्येक बुद्धिबळप्रेमीसाठी नक्कीच संस्मरणीय ठरेल आणि त्यामुळे ग्रँडमास्टरपासून नवोदित खेळाडूंपर्यंत सर्व बुद्धिबळ प्रेमींनी पुण्यात या अद्वितीय सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडून करण्यात येत आहे.
या बुद्धिबळ महोत्सवात खालील चार प्रमुख स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत:
FIDE महिला ग्रँड प्रिक्स – १३ ते २४ एप्रिल २०२५ (जगभरातील सर्वोत्तम महिला खेळाडूंसाठी प्रतिष्ठित स्पर्धा)
तिसरी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा (२२०० पेक्षा जास्त रेटेड खेळाडूंसाठी) – २० ते २८ एप्रिल २०२५
दुसरी महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव २२०० पेक्षा कमी रेटेड खेळाडूंसाठी – २० ते २३ एप्रिल २०२५
दुसरी महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव १८०० पेक्षा कमी रेटिंग खेळाडूंसाठी – २५ ते २८ एप्रिल २०२५
FIDE महिला ग्रँड प्रिक्स २०२५
फॉरमॅट: १० खेळाडूंची राउंड-रॉबिन स्पर्धा.
वेळ नियंत्रण: पहिल्या ४० चालींसाठी वेळ नियंत्रण ९० मिनिटे असेल, त्यानंतर उर्वरित खेळासाठी ३० मिनिटे असतील आणि पहिल्या चालीपासून प्रत्येक चालीस ३० सेकंदांची वाढ होईल.
बक्षीस रक्कम : महिला ग्रँड प्रिक्स मालिकेसाठी एकूण बक्षीस निधी 80,000 युरोपासून वाढवून 1,20,000 युरो करण्यात आला आहे. ग्रँड प्रिक्स मालिकेच्या विजेत्याला आता 30,000 युरो (पूर्वीच्या 20,000 युरोपेक्षा जास्त) मिळतील, तर उपविजेत्याला 22,000 युरो (मागील 16,000 युरोच्या तुलनेत) दिले जातील. विशेष म्हणजे, वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षीस रकमेची वाढ 15,000 युरोपासून 18,000 युरोपर्यंत झाली आहे.
महत्व: ही स्पर्धा महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद सायकलचा एक महत्त्वाचा भाग आहे.
स्पर्धेचा कालावधी:२० ते २८ एप्रिल २०२५, पुणे.
विशेष वैशिष्ट्ये: लाइव्ह कॉमेंट्री, खेळाडूंसोबत भेटीगाठी आणि बरेच काही!
तिसरी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा
पात्रता:२२०० आणि त्यावरील फिडे रेटिंग असलेल्या खेळाडूंसाठी खुली.
फॉरमॅट: १० फेऱ्यांची स्विस प्रणाली.
वेळ नियंत्रण:९० मिनिटे + ३० सेकंद प्रति चाल वाढ.
बक्षीस निधी:₹३०,००,०००, प्रथम क्रमांकासाठी ₹४,५०,०००.
विशेष बक्षीसे: उत्कृष्ट खेळाचा पुरस्कार, सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार.
नोंदणी शुल्क:
२२००-२३५० रेटिंग: ₹१०,०००
२३५१ आणि अधिक रेटिंग: ₹८,५००
जीएम, आयएम, डब्ल्यूजीएम, डब्ल्यूआयएम आणि २२०० पेक्षा अधिक रेटिंग असलेल्या विदेशी खेळाडूंसाठी प्रवेश शुल्क नाही.
स्पर्धा वेळापत्रक:२० ते २८ एप्रिल २०२५, अंतिम फेरीनंतर बक्षीस समारंभ
दुसरी महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव (२२०० पेक्षा कमी रेटिंग खेळाडूंसाठी)
पात्रता:२२०० पेक्षा कमी रेटिंग असलेल्या खेळाडूंसाठी.
फॉरमॅट:९ फेऱ्यांची स्विस प्रणाली.
वेळ नियंत्रण:६० मिनिटे + ३० सेकंद प्रति चाल वाढ.
बक्षीस निधी:₹१०,००,०००, प्रथम क्रमांकासाठी ₹१,१०,०००.
स्पर्धा वेळापत्रक:२० ते २३ एप्रिल २०२५
दुसरी महाराष्ट्र बुद्धिबळ महोत्सव (१८०० पेक्षा कमी रेटिंग खेळाडूंसाठी)
पात्रता: १८०० पेक्षा कमी रेटिंग असलेल्या खेळाडूंसाठी.
फॉरमॅट:९ फेऱ्यांची स्विस प्रणाली.
वेळ नियंत्रण:६० मिनिटे + ३० सेकंद प्रति चाल वाढ.
बक्षीस निधी:₹१०,००,०००, प्रथम क्रमांकासाठी ₹१,१०,०००.
स्पर्धा वेळापत्रक:२५ ते २८ एप्रिल २०२५
महत्त्वाचे संपर्क क्रमांक :
स्पर्धा संचालक: निरंजन गोडबोले - mahachessfest@gmail.com
समन्वयक:
अमित केंच - +९१-९९२३४२९५६१
IA जुईली कुलकर्णी (निवास व्यवस्था) - +९१-९६८९५३०९००
IA दीप्ती शिदोरे - +९१-९६०४७३७१८३
निवास व्यवस्थेसाठी संपर्क:accommodationsmca@gmail.com
गतवर्षीच्या महोत्सवातील काही रंजक क्षण :
महत्वाच्या लिंक :
चेस-रिझल्ट्स : ग्रँडमास्टर स्पर्धा , बिलो २२०० , बिलो १८००